बातम्या

मधुबाला यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Madhubalas biopic to hit the screens soon


By nisha patil - 3/18/2024 5:01:44 PM
Share This News:



 मधुबाला यांच्या सौंदर्याचे जितके चाहते आज आहेत, तितकेच त्यांच्या अभिनयाचे देखील चाहते आहेत. आजही मधुबालाचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. त्यामुळे या सर्व चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी लवकरच मधुबालाच्या चित्रपटाची पर्वणी होणार आहे. कारण 'मधुबाला' यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. 

सध्या अनेक बायोपिक मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. यामधील अनेक चित्रपट हे सध्या बॉक्स ऑफिसवरही यश मिळवतायत. हिंदीसह मराठीतही बायोपिकची मालिका सुरु आहे. नुकतच मराठी सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यातच नुकतच कंगना राणौत मुख्य भूमिकेत असलेल्या ‘एमर्जन्सि’ या चित्रपटाची देखील जोरदार चर्चा होती. आता मधुबालाच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही काळामध्ये मधुबाला यांचा बायोपिक येणार असल्याचं म्हटलं जात होतं. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या बायोपिक करणार असून अभिनेत्री क्रिती सॅनॉन यामध्ये मधुबालाच्या भूमिका साकारणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण मधुबाला यांच्या बहिण मधुर ब्रीज भूषण यांनी या सगळ्या चर्चा खोडून काढल्या होत्या. तसेच हा बायोपिक इतर कोणीही करण्याचं धाडसंही करु नये असं त्यांनी एका मुलखातीमध्ये म्हटलं होतं. पण नुकतच आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. तसेच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने या चित्रपटाची घोषणा केलीये.


मधुबाला यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला