बातम्या

सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

Madhuri Misal took darshan of Karveer resident Shri Ambabai

By nisha patil - 3/2/2025 12:48:57 PM
Share This News:

सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. 2 :  नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्या नंतर कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर भेट देऊन पुष्प अर्पण केले.

यावेळी आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आदी मान्यवर  उपस्थित होते.

सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन
Total Views: 51