मनोरंजन

माधुरी आणि करिश्मा यांनी शेअर केले खास फोटो

Madhuri and Karishma shared special photos


By nisha patil - 1/6/2023 6:55:49 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम माधुरी  आणि करिश्मा यांनी नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.अभिनेता शाहरुख खान अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 1997 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात.माधुरी आणि करिश्मा या 'दिल तो पागल है' चित्रपटामधील अभिनेत्रींनी नुकतेच एकमेकींसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.माधुरी आणि करिश्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दोघी 'बलम पिचकारी' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.करिश्मा आणि माधुरी यांनी एकमेकींसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, , 'डांस ऑफ एनवी फ्रेंडशिप'करिश्मा आणि माधुरी यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे.या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दिल तो पागल है-2' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'शाहरुख की ही कमी है बस।'सोशल मीडियावरील फोटोमध्ये माधुरी ही पिवळ्या रंगाच्या लाँग वनपिसमध्ये दिसत आहे. तर करिश्मा ही ब्राऊन अँड ब्लॅक वन पीस आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे.दोघींच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.


माधुरी आणि करिश्मा यांनी शेअर केले खास फोटो