बातम्या

महादेवराव महाडिक यांनी माजी. खास. राजू शेट्टी यांच्या खांद्यावर ठेवला हात

Mahadevrao Mahadik ex specially A hand placed on Raju Shetty s shoulder


By nisha patil - 2/29/2024 11:11:54 PM
Share This News:



राजू काय.. जोरात सुरू हाय वाटतं.. यावेळी संधी हाय, काळजीचं काय कारण नाय, अशा आपल्या खास शैलीत आणि पहाडी आवाजात माजी आमदार महादेवराव महाडिक तथा आप्पा यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्यावरच हात ठेवत म्हटले.

यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, हे दोन्ही मातब्बर पुन्हा एकमेकांच्या हातात हात देतात का? अशी चर्चाही एव्हाना सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकांचे रणशिंग केव्हाही फुंकले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये सहजरीत्या झालेल्या भेटीलाही अधिकचे महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चा सुरू आहे.

या मतदारसंघामधून राजू शेट्टी यांची एकला चलो रे भूमिका कायम असली तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने असणार की आणि अन्य उमेदवार असणार? यावर अजूनही एकमत झालेले नाही अथवा वरिष्ठ पातळीवर तसे संकेतही मिळालेले नाहीत.भाजप आणि घटक पक्षांकडूनही त्याचे असे झाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उद्योगपती संजय घोडावत यांच्या वाढदिनी संजय घोडावत महाविद्यालयात झाली. यावेळी लांबूनच आप्पांनी आपल्या खुमासदार शैलीत शेट्टी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत चिमटाही घेतला. इतकेच नव्हे,तर दोघांमध्ये बाजूला जात चर्चा झाली.

आप्पांचा आवेश पाहता ती राजकीय असली पाहिजे,यावर कुणाचेही दुमत असायचे कारण नाही. भेटीनंतर आप्पा माझ्यासोबत असतील अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली, तर शेट्टी यांनी सुरुवातीपासूनच मदत केली असल्याचे आप्पा म्हणाले. इतकेच नव्हे, तर शेट्टी यांचे काम आघाडी व पक्षापेक्षा वेगळे असल्याचे ते म्हणाले. शेतकरी चळवळीला योग्य दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर मात्र नव्या राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे.


महादेवराव महाडिक यांनी माजी. खास. राजू शेट्टी यांच्या खांद्यावर ठेवला हात