बातम्या
विकेंडला सलग सुट्ट्या जोडून आल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसला गर्दी
By nisha patil - 12/8/2023 5:22:12 PM
Share This News:
विकेंडपासून ते 16 ऑगस्टपर्यंत सुट्ट्या जोडून आल्याने प्रवाशांची गर्दी असताच महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात मोठी गैरसोय झाली आहे. जळगाव-भुसावळ विभागामध्ये ब्लॉक घेऊन तिसरा रेल्वेमार्ग आणि यार्ड रिमॉडेलिंगशी संबंधित आवश्यक तांत्रिक कामे केली असल्याने 12 आणि 14 ऑगस्टला सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 11039) तसेच 13 ऑगस्टला सुटणारी नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114), जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (02132) रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातून सुटणारी आज शनिवार (दि. 12) व सोमवारी (दि.14), तर गोंदियातून सोमवार, 14 आणि 15 तसेच 16 रोजी सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
प्रामुख्याने 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक असला तरी 13 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाड रेल्वे स्थानकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या 33 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, 19 प्रवासी रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
आरक्षण केलेल्यांचे गाडी रद्द झाल्याने मोठी गैरसोय
सुट्टीच्या कालावधीत विशेषत: सर्वाधिक लांब पल्ल्याच्या असणार्या गाडीला प्रवाशांची मोठी मागणी असते. विकेंडला सलग सुट्ट्या जोडून आल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसला गर्दी आहे. त्यामुळे हे नियोजन लक्षात आगाऊ आरक्षण केलेल्यांचे गाडी रद्द झाल्याने मोठी गैरसोय झाली आहे. आरक्षणाचे पैसे परत मिळणार असले तरी सुट्ट्यांच्या कालावधीत केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. रेल्वे रद्द झाल्यानंतर खासगी बसवाल्याकंडून होणारी लूट नव्याने सांगण्याची गरज नाही.
विकेंडला सलग सुट्ट्या जोडून आल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसला गर्दी
|