विशेष बातम्या
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला धनंजय महाडिक यांच्यातर्फे बक्षिस
By nisha patil - 3/20/2025 7:53:45 PM
Share This News:
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला धनंजय महाडिक यांच्यातर्फे बक्षिस
भिमा साखर कारखान्याच्या वतीने एक लाखांचे सन्मानचिन्ह प्रदान
महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या पृथ्वीराज मोहोळचा भिमा साखर कारखान्याच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने हे बक्षिस कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी कुस्ती क्षेत्रातील सद्यस्थिती आणि आगामी योजनांबाबत चर्चा झाली. पुढील वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन भिमा उद्योग समूहामार्फत करण्याचा मानस असल्याचे विश्वराज महाडिक यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रीय मल्ल अनिकेत सोनवणे, पवन लोणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला धनंजय महाडिक यांच्यातर्फे बक्षिस
|