बातम्या

महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटप करायला सुरुवात

Mahavikas Aghadi has started allotting Lok Sabha seats


By nisha patil - 2/16/2024 1:06:36 PM
Share This News:



महाविकास आघाडी  लोकसभा जागा वाटप करायला सुरुवात 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे वारे देशात सर्वत्र वाहू लागले आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष  लोकसभेची तयारीला लागले आहेत. दुसरीकडे भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फोडायला सुरुवात केली आहे. मात्र या सर्वांमध्ये महाविकास आघाडी आपल्या लोकसभा जागा वाटप करायला सुरुवात केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू झालीय.
 

 याच चर्चेमधून आता लोकसभेच्या दोन जागांवर निर्माण झालेला तिढा सुटत असल्याचा  दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघांची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून लढवली जाईल. त्या जागेवरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळणार आहे. या दोन्ही जागा कोणी लढवायच्या याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये एक मत झाल्याची माहिती समोर आली आहे.  महाविकास आघाडी लवकरच कोणाला कोणत्या जागा मिळाला आहेत हे अधिकृत जाहीर  करेल.


महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटप करायला सुरुवात