बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा घटनेवर महाविकास आघाडीने राजकारण करू नये

Mahavikas Aghadi should not play politics on Chhatrapati Shivaji Maharaj statue incident


By nisha patil - 1/9/2024 7:28:50 PM
Share This News:



सिंधूदुर्ग येथील झालेली घटना ही दुर्दैवी असून महाविकास आघाडी या घटनेचे राजकारण करत आहे. महाविकास आघाडीच्या या भूमिके विरोधात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक याठिकाणी निषेध करण्यात आला. 

यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता कि जय, महाविकास आघाडीचा धिक्कार असो, महाविकास आघाडीचे करायचे काय? खाली डोक वर पाय अशा घोषणा देत चौक दणाणून सोडला.

याठिकाणी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, सत्यजित उर्फ नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव बोलताना म्हणाले, सिंधूदुर्ग येथील झालेली घटना ही अत्यंत दुर्देवी घटना आहे  याचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. पण महाविकास आघाडी या घटनेचे राजकारण करताना दिसत आहे याच्याच निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून कठोर शिक्षा झाली पाहिजे हि भाजपाची सातत्याने भूमिका राहील. या झालेल्या घटने बद्दल देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार असतील यांनी माफी मागितली आहे. 

तसेच विशाळगडावरील अतिक्रमण काढत असताना महाविकास आघाडी कुठे गेली होती त्यावेळी महाविकास आघाडी मधील एकही नेत्याने याविषयावर बोलणे टाळले होते. त्यावेळी या अतिक्रमणाला छुपा विरोध महाविकास आघाडीने केला याला देखील जनता बरोबर उत्तर देईल यात शंका नाही. कर्नाटका मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला तेव्हा महाविकास आघाडी कुठे गेली होती केवळ मतांसाठी महाविकास आघाडी राजकारण करत आहे असा सवाल यावेळी केला. 

यावेळी भाजपा प्र. का सदस्य राहूल चिकोडे म्हणाले, २०१४ साला पासून देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने सरकार सुरु आहे देशाची प्रगती होत असलेली आपल्याला दिसत आहे. देशामध्ये सगळे सुरळीत चालू असलेले बघवत नसल्याने महाविकास आघाडी सरकार कडून जनतेमध्ये नरेटीव्ह पसरवण्याचे काम चालू आहे. सिंधूदुर्ग येथील झालेल्या घटनेवर महाविकास आघाडीकडून सुरु असलेल्या राजकारणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने आम्ही इथे एकत्र आलेलो आहे. सदर घटनेतील दोषी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी याठिकाणी व्यक्त करतो. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, गिरीष साळोखे, सुलोचना नार्वेकर यांनी सिंधुदुर्ग येथील घडलेल्या घटनेवर महाविकास आघाडी कडून चालू असलेल्या राजकारणावर निषेध नोंदवत मनोगत व्यक्त केले.  

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अजित ठाणेकर, शैलेश पाटील, जयराज निंबाळकर, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगला निपाणीकर, किरण नकाते, दिलीप मेत्राणी, तौफिक बागवान, प्रदीप उलपे, सागर रांगोळे, मानसिंग पाटील, रविकिरण गवळी, अमेय भालकर, अनिल कामत, संतोष माळी, प्रग्नेश हमलाई, सयाजी आळवेकर, अमित पसारे, नरेंद्र पाटील, सचिन घाटगे, राहुल जानकर, श्वेता गायकवाड, प्रणोती पाटील, अश्विनी गोपुगडे, वंदना बंबलवाडे, योगेश साळोखे, कार्तिक देशपांडे, संजय पाटील, धीरज करलकर, प्रवीण शिंदे, युवराज शिंदे, विवेक कुलकर्णी, प्रसाद पाटोळे, प्रशांत अवघडे, बालाजी चौगले, सुधीर बोलावे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


छत्रपती शिवाजी महाराज पुतळा घटनेवर महाविकास आघाडीने राजकारण करू नये