बातम्या
ठाकरे स्वबळावर महाविकास आघाडी फूटली.
By nisha patil - 11/1/2025 2:42:27 PM
Share This News:
ठाकरे स्वबळावर महाविकास आघाडी फूटली.
येणाऱ्या महापालिका व सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही मोठी घोषणा केलीय.त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं दिसून येतय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच आता विधानसभेत दारुण पराभव करावा लागलेल्या महाविकास आघाडीत फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई ते नागपूर पर्यंतच्या सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हे स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलय. तसेच कार्यकर्ते मागे पडत आहेत कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार ? त्याचा फटका पक्षाला बसतो, आम्हाला आजमावून बघायचं आहे
असंही राऊत म्हणालेत. त्याचबरोबर कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय.
आता ठाकरे गट बाहेर पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाविकास आघाडीला कितपत यश मिळते हे पहावं लागेल.
ठाकरे स्वबळावर महाविकास आघाडी फूटली.
|