बातम्या

महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा तिडा अजूनही अधांतरी मात्र प्रचारात आघाडी- व्ही. बी. पाटील-आर के पोवार

Mahavikas Aghadis Kolhapur crisis is still in turmoil but the campaign is leading V B PatilbRK Powar


By nisha patil - 8/3/2024 6:31:33 PM
Share This News:



महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा तिडा अजूनही अधांतरी मात्र प्रचारात आघाडी-  व्ही. बी. पाटील-आर के पोवार

कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर लोकसभा पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने 1999 पासून कायम काँग्रेस-राष्ट्रवादी युतीमध्ये राष्ट्रवादीला मिळत गेलाआहे.असेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कोल्हापूर यांनी काढलेल्या आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्राध्यापक संजय मंडलिक हे विजयी झाले पूर्वाश्रमीचे ते ही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते पुढे जाऊन युती संपुष्टात आली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी आघाडी झाली ती आजही कायम आहे. 

उद्धव ठाकरे, शरद पवार व राष्ट्रीय काँग्रेस आजही भक्कमपणाने महाविकास आघाडीमध्ये आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे परंतु सध्या त्यांचे खासदार हे शिंदे गटाकडे आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्षानुवर्षी जागा लढवत असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटावी यासाठी प्रयत्नशील आहे. 
   

 त्यातच राष्ट्रीय काँग्रेसने सदरच्या जागेवर हक्क सांगितला आहे कारण लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन काँग्रेसचे आमदार असल्यामुळे आपल्या पक्षाला मिळावे अशी भूमिका घेतली आहे परंतु आज पावतो महाविकास  आघाडीने सदर जागा कोणत्या पक्षाला द्यावयाची किंवा कसे याबाबत निर्णय घेतलेला नाही असे असताना सध्या महाविकास आघाडी भक्कमपनाने कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळू दे व उमेदवार कोणीही असू दे यासाठी गेली चार महिने लोकसभा प्रचाराची यंत्रणा निर्माण करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 3 जुलै 2023 रोजी फुटीनंतर जिल्हा अध्यक्ष व्ही. बी. पाटील व आर के पोवार यांनी बारा तालुक्यांमध्ये जुन्या नव्यांना घेऊन भक्कमपणाने पक्ष उभा केला आहे. बूथ कमिट्यापासून सर्व यंत्रणा उभी केली आहे आणि साहजिकच शिवसेनेला तिकीट मिळणार नसेल तर ते प्राधान्य क्रमाने राष्ट्रवादीला मिळावे जेणेकरून राष्ट्रवादीची तुतारी अधिक भक्कमपनाने ग्रामीण भागामध्ये पोहोचेल आणि विजय सुकर होईल अशी आशा आहे.

एकंदरीत पाहता सदरची जागा राष्ट्रवादीला सुटली तर त्याचे नियोजन  भक्कमपनाने करण्याविषयी पक्ष पातळीवर तयारी सुरू आहे असे  व्ही. बी. पाटील व आर के पोवार यांनी काढलेल्या प्रसिद्धीला म्हटलं आहे.

 महाविकास आघाडीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तरी इंडिया आघाडी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन्हीही जागा निवडून आणण्याविषयी जीवाचे रान केले जाईल असे ही या पत्रकात म्हटले आहे.


महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा तिडा अजूनही अधांतरी मात्र प्रचारात आघाडी- व्ही. बी. पाटील-आर के पोवार