बातम्या
बारामती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
By nisha patil - 4/2/2025 4:19:47 PM
Share This News:
बारामती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: महावितरणच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या वर्षी बारामती परिमंडलात ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होईल. स्पर्धेत ११०० खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स आदी २२ क्रीडा प्रकारांची स्पर्धा होईल. पारितोषिक वितरण कार्यक्रम ८ फेब्रुवारीला होईल.
बारामती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
|