बातम्या

महायुती राज ठाकरेंसाठी 'ही' महत्वाची जागा सोडणार..?

Mahayuti will leave this important seat for Raj Thackeray


By nisha patil - 3/14/2024 5:24:53 PM
Share This News:



एकीकडे महायुतीच्या जागावाटपाचा  लोकसभेसाठीचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये. अशातच त्यात आता महायुतीची साथ मनसे देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसेसाठी एक ते दोन जागा सोडण्यासाठी भाजप  आणि शिवसेना  सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच यासंदर्भात दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मनसे महायुतीकडून आगामी लोकसभा  लढवणार का? आणि मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

मिळालेल्या  माहितीनुसार, भाजप आणि मनसे यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे, मुंबईचा मध्यवर्ती भाग. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच दक्षिण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचं वजनही मोठं आहे. दक्षिण मुंबईतील मोठ्या प्रमाणातील मराठी व्होटबँक मनसेच्या बाजूनं आहे. गेल्या निवडणुकीतही मराठी व्होटबँक मनसेनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ठाकरेंना चितपत करण्यासाठी भाजपनं मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखली आहे असे म्हणायला काही हरकत नाही


महायुती राज ठाकरेंसाठी 'ही' महत्वाची जागा सोडणार..?