नूतन पोलीस अधीक्षक म्हणून महेंद्र पंडित रुजू

Mahendra Pandit will join as the new Superintendent of Police


By nisha patil - 5/27/2023 5:02:16 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  कोल्हापूर जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षकपदाचा पदभार महेंद्र पंडित यांनी आज स्वीकारला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नवनवीन उपक्रम देखील राबवणार असल्याचं नूतन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी बलकवडे यांनी नूतन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यानंतर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


नूतन पोलीस अधीक्षक म्हणून महेंद्र पंडित रुजूspeednewslive24#