बातम्या

महावितरणकडून पावसाळयाआधी विद्युत वाहिनी व प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात

Maintenance and repair work of electricity channel and system in final stage before monsoon from Mahavitran


By nisha patil - 5/25/2024 10:44:02 PM
Share This News:



कोल्हापूर : पावसाळयामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.

महावितरणकडून प्राधान्यक्रमानुसार वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. त्यात उपरी वीजवाहिन्यांना स्पर्श करत असतील त्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, स्टे वायरमध्ये स्टे इन्सुलेटर तपासणे व दुरुस्त करणे.वाहिन्यांचे जळालेले वा खराब झालेले जंपर बदली करणे, वाकलेले वा गंजलेले पोल बदली करणे. उंचीबाबतचे निकष न अनुसरलेल्या सैल झालेल्या तारा ओढणे.लघुदाब वाहिनीवर पीव्हीसी स्पेसर्स बसविणे.उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांना गार्डिंग पुरविणे, रस्त्यालगतच्या व रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांच्या गार्डींगची तपासणी करणे व त्याचा योग्य तो ताण ठेवणे. उच्चदाब व लघुदाब खांबाचे पुर्ण अर्थिग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे.वितरण रोहित्रांचे पुर्ण अर्थिग तपासणे आणि तुटलेल्या अर्थवायर पुर्ववत करणे. रोहित्र वितरण पेटींची जळालेली केबल बदली करणे, रोहित्र वितरण पेटीस आर्थिंग करणे. रोहित्राच्या तेलाची गळती थांबविणे. रोहित्राच्या ब्रीदरमधील सिलीका जेल बदली करणे.

रोहित्र व वाहिन्यांचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे. लघुदाब वितरण पेटीची किरकोळ दुरुस्ती करणे व दरवाजा नसल्यास लावणे. भूमीगत वीज वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉइंट कायमस्वरुपी करणे. उच्चदाब व लघुदाब फीडर पीलरचे पुर्ण अर्थिग तपासणे तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे. जळालेल्या वा तुटलेल्या सर्व्हिस वायर बदली करणे.

नादुरुस्त उच्चदाब वाहिनी कपॅसिटर दुरुस्त व बदली करणे. निकामी वा तुटलेले वीज खांब बदली करणे. उपकेंद्रातील खराब असलेले कपॅसिटर बदली करणे, उपकेंद्रांची अर्थिग तपासणी करणे. उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढणे व स्वच्छता करणे. उपकेंद्रांतील लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरुस्त असल्यास नवीन लावणे.उपकेंद्रांतील बॅटरींची स्थिती तपासणी करणे व मेंटेनन्स करणे.उपकेंद्रातील आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे व दुरुस्त करणे.रोटरी स्वीच तपासणी करणे व दुरुस्त करणे. पीलरचे अर्थिग तपासणे व दुरुस्ती करणे. जळालेल्या वा तुटलेल्या केबल बदली वा दुरुस्ती करणे. परिस्थितीनुसार आवश्यक असलेली इतर कामे सर्व वाहिन्यांचे तसेच उपकेंद्रांचे, रोहित्रांचे मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.

आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सामुग्री आणि उपकरणांचा साठा जसे की, रोहित्र ऑईल, वीज खांब, इन्सुलेटर इ. उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पावसाळयामध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरु राहण्याकरीता क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्ष राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.


महावितरणकडून पावसाळयाआधी विद्युत वाहिनी व प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात