बातम्या

सत्यजीत पाटील यांना विजयी करा -प्राजक्ता पाटील

Make Satyajit Patil win Prajakta Patil


By nisha patil - 4/22/2024 11:32:52 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी सत्यजीत पाटील आबा यांना विजयी करा असे आवाहन सौ प्राजक्ता सत्यजित पाटील यांनी केले पोर्ले तर्फ ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. विकासाची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करूया असे त्या पुढे म्हणाल्या. अध्यक्षस्थानी पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील होते.
       

यावेळी बोलताना ऍड. विजयसिंह पाटील यांनी आबांना सर्वदूर मिळणारा प्रतिसाद विजयाची नांदी असल्याचे सांगीतले. माजी सभापती संजय चावरेकर यांनी  मूलभूत सुविधा गावागावात आणण्यासाठी आपला खासदार असणे आवश्यक आहे असे सांगीतले.
उप तालुका प्रमुख सौ कोमल तांदळे यांनी उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सत्यजीत पाटील यांना खासदार म्हणून संधी द्या असे सांगीतले. शेवटी तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी मशाल चिन्ह सर्वापर्यंत पोहोचवा असे आवाहन केले .
यावेळी  तालुका प्रमुख सौ चंद्रभागा चौगुले, उप तालुका प्रमुख सौ माया चौगुले, अंगद शेवाळे, एन टी चौगुले, नंदू गुरव, संदीप चौगुले आर डी नांदगावकर यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.


सत्यजीत पाटील यांना विजयी करा -प्राजक्ता पाटील