बातम्या
तृतीयपंथीयांसाठी वेगळे शौचालय करा
By nisha patil - 1/1/2024 3:05:51 PM
Share This News:
तृतीयपंथीयांसाठी वेगळे शौचालय करा
मनसेच्या वतीने उप आयुक्त महानगरपालिका याना दिले निवेदन
१५ दिवसात शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी ,अन्यथा मनसेकडून आंदोलन करण्याचा इशारा
कोल्हापूर शहरात तृतीयपंथीय वर्गाची संख्या जवळपास १५ ते २० हजारच्या आसपास आहे... बहुतांश तृतीयपंथीवर्ग हा झोपडपट्टीसारख्या भागात राहत आहे... तसेच नोकरीची सोय नसल्याने रस्त्यावर सिग्नलवर भटकंती करुन यावर्गास पोट भरावे लागते... अशावेळी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे.
सन 2014 मध्ये तृतीयपंथी हे तिसरे जेंडरचे अस्तित्व सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले व तृतीयपंथी नागरिकांसाठी राज्य व केंद्र सरकारला पुरुष, महिलांप्रमाणेच तृतीयपंथी नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश दिले... मात्र गेल्या नऊ वर्षात सरकारने तृतीयपंथीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेच नाही.
कोल्हापुरात तृतीय पंथीयांसाठी तात्काळ १५ जानेवारी २०२४ पूर्वी महानगरपालिकेच्या विशेष बजट तरतुदीचा वापर करून किमान मुख्य बस स्थानक परिसरात आणि आई अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह उभारावीत .असे निवेदन मनसेच्या वतीने उप आयुक्त महानगरपालिका देण्यात आले
या कामासाठी महानगरपालिकेकडे बजेटची तरतूद बंधनकारक आहे ही वस्तुस्थिती आहे असं असताना ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देता महानगरपालिकेने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे..असे मत मनसेच्या वतीने व्यक्त केले
महानगरपालिकेने तत्काळ १५ जानेवारी पूर्वी स्वच्छतागृह उभारावीत अन्यथा महानगरपालिकेच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल...!! असा थेट इशारा मनसेने दिला आहे
तृतीयपंथीयांसाठी वेगळे शौचालय करा
|