बातम्या
जवसचे लाडू किंवा कुकीज बनवा आणि मुलांना पण खायला घाला
By nisha patil - 1/26/2024 7:33:10 AM
Share This News:
जवसचे लाडू
साहित्य
2 कप जवसचे बी
2 कप गव्हाचे पीठ
3 मोठे चमचे खायचा डिंक 2 मोठे चमचे बादाम
2 मोठे चमचे पिस्ता
2 मोठे चमचे चारोळी
2 मोठे चमचे खरबूजचे बी
6-7 वेलची
थोडेसे अक्रोट
एक वाटी शुद्ध तूप
कृती
एका कढईत तूप टाकून त्यात डिंक तळून घेणे. डिंकला तळल्यानंतर एक ताटात काढून घेणे व त्यांना तोडून घेणे त्यानंतर गव्हाचे पीठ घेणे व ते कढईत भाजून घेणे छान वास आल्यानंतर ते ताटात काढून घेणे आता जवस पण भाजून घणे व ती थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणे मग एक बाउल घेवून त्यात भाजलेले पीठ, डिंक, जवस चांगले मिक्स करून घेणे जो सुकमेवा आहे त्याला पण भाजून कुटुन घेणे यानंतर आपल्याला पाक तयार करायचा आहे एक कढईत पाणी टाकून त्यात साखर टाका व घट्ट झालेत की समजेल पाक तयार झाला आहे. थंड झालेल्या पाकला त्या मिश्रणात टाकून त्याचे लाडू तयार करा.
जवसचे कुकीज
साहित्य
1 कप साखर
1 कप गव्हाचे पीठ
1 छोटा चमचा बेकिंग सोडा 1 चमचा ओट्स पावडर
2 चमचे लोणी
1 चमचा वनीला एसेंस
कृती
कुठल्या पण बेकिंगला बनवण्यासाठी ओव्हनला प्रिहीट करावे लागते एक पातेलित लोणी घेवून त्यात साखर टाका आणि वितळू देणे व ते खाली काढून घेणे गॅस वरून मग त्यात सर्व साहित्य टाकणे व चांगले मिक्स करणे मग छोट्या छोट्या गोळ्या बनवून बिस्किटचा आकर देणे. मग याला बेकिंग प्लेट मध्ये बटर किंवा तूप लावून ओव्हनमध्ये 15-20 मिनिट पर्यंत बेक करणे. हे बिस्किट सर्वांना पसंत येतील.
जवसचे लाडू किंवा कुकीज बनवा आणि मुलांना पण खायला घाला
|