बातम्या

दर्जेदार रस्ते करा कोणत्याही प्रकारची हायगय नको

Make quality roads


By Administrator - 5/1/2024 5:05:46 PM
Share This News:



दर्जेदार रस्ते करा कोणत्याही प्रकारची हायगय नको 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवर दर्जेदार काम करणेसाठी  कंत्राट घेतलेबद्दल मनसेच्या वतीने महानगरपालिका समोर अनोखे स्वागत आंदोलनं काढण्यात आलं. यावेळी १०० कोटींच्या निधीमधून चांगला दर्जेदार रस्ता कोल्हापुरात बांधावा यासाठीचे मनसेकडून सोलापूरतील एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीचे संचालक अशोक भोसले  यांना  निवेदन देण्यात आलं.
    कोल्हापुरातील रस्ते बांधकामासाठी एकनाथ शिंदे यांनी शंभर कोटीचा निधी मजूर केला आहे. शहरातील रस्ते बांधकामाचे सोलापूरतील एव्हरेस्ट इन्फ्रा  या कंपनीला   कंत्राट देण्यात आले आहे.
    रस्त्यातील खड्डयांमुळे मानेचे हाड, पाठीचा मणका, धुळीमुळे श्वसनाचे विकार तसेच अन्य व्याधींनी कोल्हापूरकरांना घेरलेले आहे, या सर्व त्रासांमधुन मुक्ततेसाठी आपण विहीत कालावधीनंतरही टिकतील अशा पध्दतीचे रस्ते बांधणीसाठी जो १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून दर्जदार रस्त्यांची निर्मिती करा याला मनसे पाठींबा देईल. तसेच
कोणतेही चांगले काम करताना विनाकारण कोणत्याही हेतूमुळे आपणास काही अडचणी येत असतील. आपणावर कोणीही कोणत्याही कारणासाठी दबाब टाकत असेल तर आमच्याशी संपर्क साधा, 
विनादडपण दर्जेदार रस्ते करुन पिढ्यानपिढ्या आपले नाव शाहु नगरीत व्हावेत असे निवेदन मनसेच्या वतीने सोलापूर येथील एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीचे संचालक अशोक भोसले  यांना देण्यात आलं. 
    यावेळी राजु दिंडोर्ले, प्रसाद पाटील, निलेश धुम्मा,अभिजित राऊत, राजू पाटील, निलेश आजगावकर आदीसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


दर्जेदार रस्ते करा कोणत्याही प्रकारची हायगय नको