बातम्या

हिवाळ्यात बनवा चविष्ट आणि पौष्टीक बाजरीची खिचडी, रेसिपी जाणून घ्या

Make tasty and nutritious millet khichdi in winter


By nisha patil - 12/19/2023 7:14:23 AM
Share This News:



हिवाळ्यात  शरीराला उबदार ठेवणाऱ्या खाद्यपदार्थांच्या शोधात असतो. पण आहारात अशा गोष्टींचा समावेश केला जातो ज्या शरीराला उबदार ठेवतात आणि निरोगी देखील असतात. हिवाळ्यात गरम खिचडी सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात बाजरीची खिचडी खालली जाते. बाजरी ही पचायला सोपी असते आणि पौष्टीक देखील असते.घरीच बाजरीची खिचडी बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. साहित्य -
2 कप बाजरी
1 टीस्पून मीठ
1 कप शेंगदाणे
1 टीस्पून हिंग
2 टेबलस्पून साजूक तूप
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून धणे पावडर
1 टीस्पून गरम मसाला
1 टीस्पून लाल तिखट

कृती- 
सर्वप्रथम बाजरी घेऊन 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून बाजूला ठेवा.यानंतर बाजरी बारीक करून घ्या. त्यातून बाहेर येणारी भुसाही वेगळा  करा.
आता प्रेशर कुकर मध्ये  बाजरी आणि शेंगदाणे घाला आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. बाजरी मऊ झाली की शिजली आहे असे समजून घ्या.
आता कढईत तूप टाकून त्यात हिंग व जिरे  टाका. यानंतर धणे पूड, गरम मसाला आणि तिखट वगैरे घालून त्यात शिजवलेली  बाजरी घाला.
मिश्रण चांगले मिसळा. एक वाफ द्या. बाजरीची खिचडी तयार.गरम बाजरीची खिचडी  पापडासोबत सर्व्ह करा.


हिवाळ्यात बनवा चविष्ट आणि पौष्टीक बाजरीची खिचडी, रेसिपी जाणून घ्या