विशेष बातम्या

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी डाएट मध्ये करा हे बदल!

Make these diet changes to get glowing skin


By nisha patil - 3/6/2023 7:35:06 AM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम:चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करा

बहुतेक लोकांना सकाळी उठल्यानंतर थेट चहा किंवा कॉफी पिणे आवडते, परंतु असे करणे आपल्यासाठी चुकीचे ठरू शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाण्याचे सेवन करावे. सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते, तर दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

हलका नाश्ता घ्या

जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे नाश्ता करत नाहीत तर सावध व्हा कारण नाश्ता न केल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोन्ही खराब होऊ शकते. त्यामुळे नाश्ता कधीही सोडू नका. रोज हलका नाश्ता करायलाच हवा.

रोज ABC चा ज्यूस प्या

चमकदार त्वचा मिळवायची असेल तर रोज ABC चा ज्यूस प्यावा. एबीसी म्हणजे सफरचंद, बीटरूट आणि गाजराचा रस. ते प्यायल्याने चेहरा सुधारतो.

फळे खा

फळांचे सेवन दररोज करावे. कारण फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात, म्हणून दररोज फळांचे सेवन केले पाहिजे.

भरपूर पाणी प्या

निरोगी त्वचा हवी असेल तर भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने त्वचेवर चमक येते.


चमकदार त्वचा मिळवण्यासाठी डाएट मध्ये करा हे बदल!