बातम्या
मेकर ॲग्रो इंडीया प्रा. लि. या विरुध्द शाहूपुरीत गुन्हा दाखल
By nisha patil - 4/13/2024 10:52:18 PM
Share This News:
कोल्हापूर यांची कामगिरी मेकर ॲग्रो इंडीया प्रा. लि. या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ७६४/२०१८ भा.दं.वि.स कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब), २०१ सह एम पी आय डी कायदा कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल असून, सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखे मार्फत सुरु
आहे.
दाखल गुन्हयातील आरोपीत नामे सुरेश चापाजी जुन्नरे वय ६५ वर्षे रा. रत्नदिप कॉलनी,
बी/३५ भाईचंद्र टेक्सटाईल भांडुप पश्चिम यास दि. १२/०४/२०२४रोजी अटक केली असुन
मा.कोर्टाकडुन सदर आरोपीस दि. १५/०४/२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच
अपहार कंपनीचे मार्केटींग कन्सलटंट आरोपी श्रीधर हरिश्चंद्र खेडेकर वव ५५रा. स. न. ३८/०१/१
हाऊस नं. २, श्रीनगररेसीडेन्सी जवळ, पिंपळे गुरव, पुणे यास आज दि. १३/०४/२०२४ रोजी अटक
केली असुन मा. कोर्टाकडुन सदर आरोपीस दि. १८/०४/२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर
केलेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे
शाखा रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये मा.उच्च
न्यायालय मुंबई यांनी विशेष तपास पथक नेमुन आरोपी अटक करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्याप्रमाणे दि.०८/१२/२०२३ रोजी विशेष तपास पथक नेमण्यात आलेले आहे. आज अखेर विशेष
तपास पथकाकडुन मेकर अॅग्रो इंडीया प्रा. लि.चे मुख्य सुत्रधार आरोपी रमेश महादेव वळसे पाटील
याचेसह १५ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आजपावेतो दाखल गुन्हयात एकुण १८
आरोपींना अटक करण्यात आले आहेत. उर्वरीत ०५ आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके पुणे, पालघर या
ठिकाणी रवाना केली आहेत.
आजअखेर मेकर ॲग्रो इंडिया प्रा. लि. मधील आरोपीत यांची स्थावर मालमत्ता - २
कोटी, ३५ लाख १४ हजार ९३७/- रुपये आणि जंगम मालमत्ता
२,१०,०००/- जप्त
करण्यात आलेली आहे. १ लाख रुपयाची एफडी फ्रिज करण्यात आलेली आहे. सदर मिळकतीवर
एमपीआयडी कायद्या अंतर्गत उपविभागीय अधिकारी करवीर विभाग, कोल्हापूर यांची समक्ष प्राधिकारी
म्हणुन नेमणुक झालेली आहे. आरोपीच्या नविन स्थावर मिळकतीची माहिती प्राप्त झालेली आहे. सदर
मिळकतीचे शासकीय मुल्यांकन करुन घेवुन, एमपीआयडी अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू
आहे.
मेकर ॲग्रो इंडीया प्रा. लि. या विरुध्द शाहूपुरीत गुन्हा दाखल
|