बातम्या
मलायका आरोरा ते अनुपम खेर; या सेलिब्रिटींनी खास पद्धतीनं दिल्या योगा दिनाच्या शुभेच्छा
By nisha patil - 6/21/2023 9:47:52 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात आणि राज्यात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ता बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मलायका अरोराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन योगाचे फायदे सांगितले आहेत. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शन लिहिले - 'हे माझे विचार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा.'मलायकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये योगा करण्याचे फायदे लिहिले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ते योगा करताना दिसत आहेत.रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर देखील योगा करते. योग दिनानिमित्त तिनं योगा करतानाचा एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.अभिनेत्री ईशा देओलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर योगा करतानाचा एक फोटो शेअर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मलायका आरोरा ते अनुपम खेर; या सेलिब्रिटींनी खास पद्धतीनं दिल्या योगा दिनाच्या शुभेच्छा
|