बातम्या

माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत माळवाडी शाळा प्रथम

Malwadi School first in my school beautiful school competition


By nisha patil - 9/3/2024 5:52:40 PM
Share This News:



माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत माळवाडी शाळा प्रथम

आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अध्यक्ष के.पी.खोत बक्षीस स्विकारताना

शाळेला मिळालेला पुरस्कार हा संपूर्ण गावकर्रांचा सन्मान- डॉ. के.पी.खोत

मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत विद्यामंदिर माळवाडी शाळेचा प्रथम क्रमांक आला  असून यासाठी त्यांना तीन लाखाचे पारितोषिक आमदार विनय कोरे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या स्पर्धा शिक्षण विभाग पंचायत समिती शिक्षण विभाग  व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे व संबंधित विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माळवाडी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. के.पी.खोत,  मुख्याध्यापिकापक संध्याराणी खडके,संजय बचाटे, प्रभाकर पाटील, संभाजी सुतार, के वाय पाटील, आदी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेला मिळालेला पुरस्कार हा गावकऱ्यांना सहकार्यामुळे मिळाला असल्याचे शालेय शिक्षण अध्यक्ष डॉ. के.पी.खोत यांनी सांगितले.


माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत माळवाडी शाळा प्रथम