बातम्या
शिवसेना आयोजित "लोकनाथ चषकावर नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक सलग दुसऱ्यावर्षी मोहर
By nisha patil - 2/13/2024 7:30:30 PM
Share This News:
कोल्हापूर दि.१३ : शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा बावडा विभागाच्या वतीने आयोजित "लोकनाथ चषक" टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवत कसबा बावड्याच्या नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौकाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर मोहर उमटवली. दि.८ फेब्रुवारी पासून कसबा बावड्यातील पॅव्हेलियन ग्राउंडवर "लोकनाथ चषक" भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील नामांकित संघासह सीमा भागातील संघानीही सहभाग घेतला होता.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा बावडा विभागातर्फे "लोकनाथ चषक" भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेच्या अंतिम सामना नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक विरुद्ध कै.शहाजी मासाळ स्पोर्ट्स मुंबई यांच्यात प्रकाश झोतात रंगला. या सामन्यात नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारली. प्रथम फलंदाजी करताना कै.शहाजी मासाळ स्पोर्ट्स मुंबई संघाला ७ षटकांमध्ये ८ गडी बाद ३७ धावा बनविता आल्या. उत्तरादाखल खेळताना नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स संघाने स्फोटक फलंदाजी करत २ गड्यांच्या मोबदल्यात ३.१ षटकात धावांचे आव्हान पूर्ण करून "लोकनाथ चषक" काबीज केला. विजेत्या संघास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी श्री.राजेश क्षीरसागर आणि युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते "लोकनाथ चषक" आणि रोख रु.१ लाख बक्षीस प्रदान करण्यात आले. तर उपविजेता कै.शहाजी मासाळ स्पोर्ट्स मुंबई संघास युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण व शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव यांच्या हस्ते उपविजेता चषक आणि रु.५० हजार बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत हॉटेल जिजाऊ प्रणित गोळीबार स्पोर्ट्स आणि बिबट्या बोळ प्रणित कै.पुंडलिक आण्णा वाईंगडे स्पोर्ट्स संघांना प्रत्येकी ट्रॉफी आणि रोख.रु.१० हजार बक्षीस देवून गौरविण्यात आले. यासह मालिकावीरसाठी संदीप मकवाना नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स या खेळाडू "सायकल", स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अभिषेक ( मुंबई ) कै. शहाजी मासाळ स्पोर्ट्स यास "क्रिकेट बॅट", उत्कृष्ट गोलंदाज विकी पुजारी नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स यास "स्पोर्ट्स शूज", अंतिम सामन्यातील सामनावीर साहिल मोमीन नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स याला "स्मार्ट वॉच" सह सलग तीन षटकार, प्रथम हॅट्रिक साठी आकर्षक बक्षिसे अशी वैयक्तिक भरघोस बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेदरम्यान रेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर स्टार या दोन संघात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाने ७ षटकांमध्ये ४ गडी बाद ७१ धावा केल्या. तर कोल्हापूर स्टार ६.४ षटकांमध्ये ५ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावा बनवून विजयश्री प्राप्त केला. विजेत्या कोल्हापूर स्टार संघास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेता चषक व रोख रु.२५ हजार बक्षीस देवून गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, उदय भोसले, किशोर घाटगे, शहर समन्वयक सुनील जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख रोहन उलपे, विराज खाडे, सुरज सुतार, उत्तम रंगापुरे, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, राकेश चव्हाण, सचिन पाटील, अभिजित केंबळे यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना आयोजित "लोकनाथ चषकावर नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक सलग दुसऱ्यावर्षी मोहर
|