बातम्या

मंडलिक यांना विजयी करण्याचा भाजपा महिला मोर्चाचा निर्धार

Mandalik to win Determination of BJP Mahila Morcha


By nisha patil - 3/4/2024 7:23:02 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी   लोकसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा महिला मोर्चाचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी शकुंतला जाधव, पूनम जाधव, शिवानी मंडलिक, रुपाराणी निकम, सीमा कदम, उमा इंगळे, माधुरी नकाते, अनिता ढवळे, मंगला निप्पानीकर, स्नेहल मोरे, रंजना शिर्के, रंजना देसाई, कादंबरी रावत यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला मोर्चा अध्यक्षा रूपाराणी निकम यांनी शकुंतला जाधव, पूनम जाधव, शिवानी मंडलिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आपल्या मनोगतामध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी मोदीजींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना करून दिली. भाजपा महिला मोर्चाचे संघटन व्यापक असून प्रत्येक भागातील महिला स्वालंबी होणे हा आमचा उद्देश असून याकामी मा.संजय मंडलिक यांच्या माध्यमातून विविध योजना शहर परिसरात मिळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.  याप्रसंगी महिला मोर्चाच्या मंडल स्तरावरील विविध पदाधिका-यांच्या नियुक्त्या आज करण्यात आल्या. नाम.चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाचे कार्य सुरु असून नरेंद्रजी मोदी यांना तीस-यंदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार याप्रसंगी उपस्थित महिलांच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी शिवानी मंडलिक यांनी उपस्थित महिलांना आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क साधून संजय मंडलिक यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले.


मंडलिक यांना विजयी करण्याचा भाजपा महिला मोर्चाचा निर्धार