विशेष बातम्या
माणगाव ऐतिहासिक परिषदेस १०५ वर्षे पूर्ण...
By nisha patil - 3/22/2025 1:07:52 PM
Share This News:
माणगाव ऐतिहासिक परिषदेस १०५ वर्षे पूर्ण...
मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा संपन्न
राजर्षी छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च १९२० रोजी माणगाव (ता. हातकणंगले) येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेस १०५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या माध्यमातून १०५ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार श्री. संजयजी शिरसाट साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर), आमदार अशोक माने, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह बार्टीचे सर्व अधिकारी-कर्मचारी, तसेच भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणगाव ऐतिहासिक परिषदेस १०५ वर्षे पूर्ण...
|