बातम्या
मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ माणगाव बंदची हाक
By nisha patil - 4/3/2025 10:08:21 PM
Share This News:
मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ माणगाव बंदची हाक
बीड : मसाजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली असून, या क्रूर हत्येच्या तीव्र निषेधार्थ माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ६ मार्च २०२५ रोजी ‘माणगाव बंद’ पुकारण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत माणगावमधील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा, बस वाहतूक आणि शाळा नियमित सुरू राहतील.
या दुर्दैवी घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, सरपंच संतोष देशमुख यांना माणगाव ग्रामपंचायतीत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
- सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, माणगाव ग्रामपंचायत, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ माणगाव बंदची हाक
|