बातम्या

चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून आडचण नसून खोळंबा

Mangaon in Chandgad taluk is a primary health center and is not a problem but a problem


By nisha patil - 7/4/2024 12:04:11 AM
Share This News:



चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून आडचण नसून खोळंबा

दुपारी एक वाजताच होते ओपीडी बंद

मोफत सुविधा असतानाही सलाईन व इंजेक्शनचे पैसे घेत असल्याची रुग्णांची तक्रार

चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून आडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.माणगाव पंचक्रोशीतील लोक डॉक्टर असूनही आरोग्य सेवेपासून वंचित त्यामुळे डॉक्टरची तात्काळ बदली व्हावी अशी माणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे . डॉक्टर अरविंद  पठाणे यांनी अखंड 25 वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्राला माणगाव येथे अखंडित सेवा दिली होती .

ना कधी वेळेचा अभाव ना तहानभूकची चिंता अशा पद्धतीने अरविंद पठाणे हे एक वर्ष झाले सेवानिवृत्त झाले .त्यांच्या जागी डॉक्टर . इलन देवण देवा हे वैद्यकीय अधिकारी म्हणून हजर  झाले .यांची कामाची पद्धत पाहता औषधाचा पुरवठा व्यवस्थित नाही .लोकांना केवळ चार तासात सेवा. एक वाजता  ओपीडी बंद. ऑपरेशन पेशंट ऍडमिट केले असता उपस्थित रहात नाहीत. आरोग्य केंद्रात पाण्याची , गाडीची गैरसोय आहे.आरोग्य केंद्रावर त्याच दुर्लक्ष आहे .

लोकांना मोफत सुविधा असतानाही ते सलाईन व इंजेक्शनचे पैसे घेतात .याबाबत संबंधित माणगाव ग्रामपंचायत इथून त्यांना व्यवस्थित आरोग्य सेवा द्यावी अशा सूचनाही वारंवार दिल्या आहेत. तरीही पंचक्रोशीतील लोकांच्या तोंडाला पाणी पुसून स्वतःचा मनमानी कारभार सुरू आहे . आरोग्य केंद्र माणगाव येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष वेधून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी होत आहे.


चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून आडचण नसून खोळंबा