बातम्या
मनजीत माने युवा सेनेच्या वतीने शक्ती कायदा अमलात आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम...
By nisha patil - 8/26/2024 3:35:30 PM
Share This News:
पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ आज बघितलं तर महाराष्ट्रातले चित्र, हे महिलांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत भयभीत होत चालला आहे, बदलापूर मधील घटना असेल,पुण्यातील असेल, अकोल्यातील असेल किंवा कोल्हापूर, या वारंवार होणाऱ्या घटना हे सांगत आहेत की, या सरकारच्या कालावधीत महिला अत्यंत असुरक्षित आहेत.त्यामुळे कोल्हापूर युवासेना -युवतीसेना
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्यावतीने भगिनी रक्षणासाठी शक्ती कायदा अमलात आणावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देणारा शक्ती कायदा अमलात आणला होता, पण त्या कायद्याची अंमलबजावणी अजून देखील झालेली नाही.. म्हणून आज कोल्हापूर शहरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात कोल्हापूर युवासेना युवती - सेना यांचे वतीने, हा कायदा लवकरात लवकर यावा यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या माता भगिनी, यांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.. रविवारी सकाळी 11 वाजता या मोहिमेची सुरुवात झाली.. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी, भगिनींच्या रक्षणासाठी शक्ती कायदा करावा व असे झाले नाही तर भागणी या स्वतःहा कायदा हातात घेऊन नराधमांना धडा शिकवती असे सांगितले..
यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते संजय पवार,सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला आघाडी संघटीका प्रतिज्ञा उत्तूरे, शहर प्रमुख रवी इंगवले, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, युवती जिल्हा प्रमुख पूनम पाटील, उपजिल्हा प्रमुख श्वेता सुतार, शहर अधिकारी योगेंद्र माने, शहर समन्व्यक चैतन्य देशपांडे, प्रथमेश देशिंगे, रोहित वेढे, लतीफ शेख,, प्रिया माने,सिद्धेश नाईक, आदित्य जाधव,आकाश शिंदे, रुद्र चौगुले, आदर्श खडके,आकाश लोंढे सुफियान कच्ची,प्रतीक क्षीरसागर, सोनिया चव्हाण, सिद्धी दामूगडे आदी
मनजीत माने युवा सेनेच्या वतीने शक्ती कायदा अमलात आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम...
|