बातम्या
मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली व सभेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे
By nisha patil - 8/8/2024 5:55:47 PM
Share This News:
मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली व सभेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे
मराठा समाजाच्या विविध प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळणेसाठी प्रयत्न करत आहेत.कोल्हापूर मध्ये शांतता रॅली पार पाडणेसाठी सकल मराठा समाज समन्वयक यांचेशी आज दि. रोजी तुळजापूर येथे एक तास चर्चा झाली. यामध्ये समन्वयक यांना मार्गदर्शक सुचना करणेत आल्या. यामध्ये मिरजकर तिकटी येथून रॅली सुरु झाले पासून जरंगे - पाटील श्री अंबाबाई मंदिरा मध्ये जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. रॅली मध्ये भगवे झेंडे, भगवा स्कार्फ, भगव्या टोप्या परिधान कराव्यात. रॅली शिवाजी चौकात आलेवर होणाऱ्या सभेमध्ये जरंगे-पाटील मराठा समाजास मार्गदशन करणार आहेत. या नंत्तर रॅलीची समाप्ती होणार आहे.
यावेळी प्रसाद जाधव,अध्यक्ष शौर्यपीठ, मराठा सेवा संघ संजयसिहं साळोखे, मराठा सेवा संघ केंद्रिय सदस्य संजय देसाई, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा चारूशिला पाटील, संभाजी ब्रिगेड निलेश सुतार, मराठा समन्वयक वैभवराज राजेभोसले, मराठा समन्वयक जितेंद्र पाटील, लखन चौगले यांचेसह कार्यकर्ते हजर होते.
मनोज जरांगे पाटील यांचे शांतता रॅली व सभेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे
|