बातम्या
ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं - मनोज जरांगे पाटील
By nisha patil - 6/12/2023 4:30:31 PM
Share This News:
ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं - मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण टिकणार नाही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज यवमाळ दौऱ्यावर
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनजरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणले मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला होता, आताही जो निर्णय येईल, त्याचा सन्मान केला जाईल. आम्ही आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण मागत आहोत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिझे असे ते म्हणाले
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दुपारच्या सुमारास न्यायमूर्तींच्या दालनात क्युरेटिव्ह याचिकेतील मुद्द्यांवर सुनावणी होईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करुन मराठा आरक्षणासंदर्भात विचारविनिमय करणार का, याबाबत स्पष्टता येईल. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेच्या निकालाबाबत फारसा उत्साह दाखवला नसल्याचं पाहायला मिळालं
मनोज जरांगे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मराठा आरक्षणाबद्दलच्या न्यायालयीन प्रक्रियेबद्दल बोलणे योग्य नाही. गेल्यावेळी मराठा समाजाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला होता, आताही जो निर्णय येईल, त्याचा सन्मान केला जाईल. आम्ही आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण मागत आहोत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिझे असे ते म्हणाले
ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं - मनोज जरांगे पाटील
|