बातम्या

कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे पाटील यांची सभा......

Manoj Jarange Patils meeting in Kolhapur tomorrow


By nisha patil - 11/16/2023 7:23:14 PM
Share This News:



मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन टप्प्यातील उपोषण केल्यानंतर आता राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तत्पूर्वी  मराठा समाजातील बांधवांना भेटण्यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहेत.या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना भेटणार आहेत. यानंतर उद्या दुपारी ऐतिहासिक दसरा चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा दुपारी तीनच्या सुमारास होणार आहे. या सभेचे नियोजन पूर्ण झाला असून या सभेस ठिकाणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली. सभेसाठी सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. या सभेला राज्यसह जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मराठा बांधव येणार आहेत. असा विश्वास मराठा समन्वयक वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केला आहे.


कोल्हापुरात उद्या मनोज जरांगे पाटील यांची सभा......