बातम्या
मनोज जरांगे यांची छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका
By nisha patil - 12/26/2023 4:58:38 PM
Share This News:
मनोज जरांगे यांची छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका
मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. दोन्ही नेत्यांकडून सतत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. "छगन भुजबळ वेडे झाले आहेत, त्यामुळे ते काही दिवसांनी कागदं खातील" असे जरांगे म्हणाले. जरांगे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, याच ठिकाणी आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा, अजूनही सुधरा भुजबळ साहेब, अन्यथा तुम्हाला शॉक बसायचा. तुम्हाला जर झटका बसला तर मला खूप टेन्शन येईल. आम्हाला एवढा चांगला माणूस पागल होऊ द्यायचा नाही. मला खूपच वाईट वाटत आहे. काय झालं असेल बरं तुम्हाला, सांगा तरी, गिरीश महाजन यांना देखील सांगितलं त्यांना घेऊन जा म्हणून, पण त्यांना देखील भुजबळ हे वेडे व्हावे वाटत आहेत. एवढा मोठा माणूस काय बोलतो. कोयता, कुऱ्हाडी आणि लाठ्याची भाषा करणारे संस्कार शिकवणार आहे का?, आमची संस्कृती कशाला काढता. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं पाहू. धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही भूमिका का स्पष्ट करत नाही. काही दिवसांनी भुजबळ कागद खातील, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे यांची छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका
|