बातम्या

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

Manoj Jarangs health deteriorated


By nisha patil - 2/14/2024 8:12:16 PM
Share This News:



मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांच्याती प्रकृती पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून डॉ.विनोद चावरे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात असून मागील 5 दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेतलेले नाही. पोटात अन्नाचा कणही नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. बुधवारी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे सांगण्यात आले. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपचार घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

आंदोलनादरम्यान जर माझा जीव गेला तर हे सरकार महाराष्ट्रात राहील का? मंत्री, आमदार हे त्यांच्या घरी राहतील का, दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसेल, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. सरकारने सग्यासोयऱयांचा अध्यादेश काढला तर त्याची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. कॅबिनेट बैठकीला हे सरकार चलढकल करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारमध्ये दंग आहेत. अजित पवार हे छगन भुजबळांना बळ देत आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नाटकं सुरू केली. लगेच अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाज सोडणार नाही! गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असे म्हणतात. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया 50 वर्षं चालणार आहे का, असा सवालही जरांगे-पाटलांनी केला.


मनोज जरांगेंची प्रकृती खालावली