बातम्या
मनोज जरांगेंचा संघर्ष आत्ता मोठ्या पडद्यावर
By nisha patil - 8/9/2023 7:11:05 PM
Share This News:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्यावर आधारित असणारा चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. नुकताच मनोज जरांगे यांना त्यांच्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे हे प्रत्येकाच्या टीव्हीमध्ये पोहोचले आता ते पडद्यावर देखील दिसणार आहे, असं म्हटलं जात आहे. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत मनोज जरांगे म्हणाले, 'आयला नवाच ताप आला तो एक. पहिलेच मी उत्तरं देऊन बेजार झालो आहे. काही लोक मला आचानक भेटायला आले, मला वाटलं ते पाठिंबा द्यायला आले आहेत. त्यांनी चित्रपटाबद्दल बोलायला सुरुवात केली. पण त्यांची ती भावना आहे. त्यांना आता मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट कधी रिलीज होणार? या चित्रपटात कोण प्रमुख भूमिका साकारणार? याबाबत जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषण करत आहेत.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी तरुण गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्र देखील सरकारने दिले आहे. पण जरांगे यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.आता जरांगे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "मागण्यांसदर्भत सरकारचा अजून निरोप आलेला नाही, उद्या माझ्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत निरोप न आल्यास सलाईन काढणार, पाणी बंद करणार"मच्याकडून शुभेच्छा
मनोज जरांगेंचा संघर्ष आत्ता मोठ्या पडद्यावर
|