बातम्या

लपून बसलेल्या मनोरमा खेडेकरांना पोलिसांनी उचललं

Manorama villagers who were hiding were picked up by the police


By nisha patil - 7/18/2024 6:33:37 PM
Share This News:



 वादग्रस्त IAS पूजा खेडकरची  आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. मनोरमा खेडकरसह पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक पौड पोलिस ठाण्यात दाखल झालं आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी 
           

 मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे.
       

मनोरमा खेडकरची आज वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आज तिला कोर्टात देखील हजर केलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिस पुढचा तपास सुरू करतील अशी माहिती आहे.


लपून बसलेल्या मनोरमा खेडेकरांना पोलिसांनी उचललं