बातम्या
आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता
By nisha patil - 8/5/2024 5:43:58 PM
Share This News:
शरद पवार यांना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होईल की नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर त्यांनी म्हटलं होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फारसे वैचारिक अंतर नाही. ते पुढे म्हणाले होते की, पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेईन. परंतु, लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट आणि काँग्रेसला किती जागा मिळतात, यावर सर्व गोष्टी अवलंबून असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
नजीकच्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. शरद पवार जे काही बोलत आहेत, ते राजकीय समीकरण अस्तित्त्वात येणार की नाही, हे सर्व ४ जूनच्या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे,
शरद पवार यांच्या ज्या वक्तव्याची चर्चा आहे, ती मुलाखत साताऱ्यात 4 मे रोजी झाली होती. त्यावेळी मी त्याठिकाणी होतो. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसला सहकार्य करु शकतात किंवा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. पण मला वाटतं की, हे सगळं 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत जर इंडिया आघाडीचे सरकार आले आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच सत्तेत सामील होण्यासाठी अनेक छोटे पक्ष काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करतील किंवा विलीन होतील.
आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता
|