बातम्या
गुढीपाडवा मेळावा तयारीसंदर्भात मराठा महासंघाची बैठक
By nisha patil - 3/4/2024 7:20:25 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी हातकणंगले मतदारसंघातून मराठा महासंघाला उमेदवारीची संधी मिळाली तर निवडणूक लढविणार आहे, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले. संघटनेतर्फ गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आयोजित केलेल्या महासंघाच्या बैठकीतते बोलतहोते.
सध्याच्यालोकसभेच्यानिवडणुकीमध्ये मराठा महासंघाचीभूमिका काय, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला असतामुळीक म्हणाले, कोल्हापूर मतदारसंघात महासंघाने महाआघाडी मार्फत उमेदवारी दिलेल्या शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मात्र, हातकणंगले मतदारसंघातून मराठा महासंघाने निवडणूक लढवावी व त्यासाठी वसंतराव मुळीक यांनी उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष सरदार पाटील तसेच इतर पदाधिकारी व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शैलजा भोसले, युवक आघाडीचे अध्यक्ष अवधूत पाटील यांनी केली. त्यानंतर मराठा महासंघाच्या प्रश्नांना केंद्रातून वाचाफोडण्यासाठी उमेदवारीबाबत चर्चा सुरूअसून,हातकणंगलेमधून संधी मिळत असेल तर आपण तयार असून, योग्य वेळ आल्यानंतर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुळीक म्हणाले. मुळीक यांनी मराठा समाजातील विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. आंदोलने, उपोषण केली होती. यांचा कोल्हापूर जिल्ह्यात चांगला जनसंपर्क असून निवडणूक लढवावी असा जनतेतून मागणी होत आहे.
गुढीपाडवा मेळावा तयारीसंदर्भात मराठा महासंघाची बैठक
|