बातम्या
कोल्हापुरात उद्यापासून मराठा समाज सर्वेक्षणाला सुरुवात; सर्वेक्षणात विचारले जाणार 181 प्रश्न
By nisha patil - 1/23/2024 12:42:51 PM
Share This News:
कोल्हापूर : मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासले पण तपासण्यासाठी उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वेक्षण केलं जाणार आहे. सर्वेक्षणात प्रामुख्याने कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे का? लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का? विधवाना कुंकू लावायची परवानगी आहे का? स्त्रिया औक्षण करतात का? विधवांचा पुनर्विवाह होतो का? मुलाचे लग्न कोणत्या वयात केले जाते? मुलांचे लग्न उशिरा होत असल्याचे कारण काय? असे 154 मुख्य सहा एकूण 181 प्रश्न विचारले जाणार आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. यातून मराठा समाजाचे मागासलेपण तपासले जाणार आहे. राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर एक नोडल अधिकारी व एक सहाय्यक नोडल अधिकारी तसेच तालुकास्तरावर बारा नोडल अधिकारी व बारा सहाय्यक मॉडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष कामकाज पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये एकूण सहा हजार 44 इतक्या प्रगणांकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी एकूण 400 इतक्या सुपरवायझरची नियुक्ती केली आहे.
सर्वेक्षणातील काही विचारले जाणारे प्रश्न
मुला मुलींच्या लग्नाचा निर्णय कोण घेते? आंतरजातीय विवाह झाला आहे का? मुलगाच पाहिजे असा आग्रह असतो का? घरात जागर गोंधळ किंवा अन्न धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबड्या बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का? कुटुंबातील आजारी सदस्याला बरे वाटावे यासाठी दृष्ट काढणे, अंगारा लावणे ,गंडा बांधला जातो का? गेले दहा वर्षात कुणी आत्महत्या केली आहे का? गरोदर महिलांचे बाळंतपण शासकीय दवाखान्यात होते का? कुटुंबातील एखाद्या सदस्याला कुत्रा ,माकड ,साप, विंचू चावल्यावर कुणाकडे उपचार घेता ? गरज पडल्यास आरोग्य सुविधा उपलब्ध होतात का? तुमचे घर मातीचे बांबूचे झोपडी दगडाचे सिमेंटचे किंवा इतर प्रकारचे आहे का? तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसला आहे? तुमच्या पारंपरिक व्यवसायावर कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय कोणता आहे? असे प्रश्न विचारले जाणार आहेत.
शहरात 1350 प्रगुणांचे प्रशिक्षण पूर्ण
शहरातील मराठा व कुला प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोग मार्फत शहरात उद्यापासून सुरू होणार आहेत. राजू मागासवर्ग आयोगाच्या सूचनानुसार महापालिकेमध्ये एक नोडल अधिकारी व एक सहाय्यक नोडल अधिकारी तसेच विभागीय कार्यालय स्तरावर चार नोडल अधिकारी व चार सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संरक्षणासाठी १३५० प्रगनांची नेमणूक केली आहे . नियंत्रणासाठी 90 पर्यवेक्षक नेमले आहेत. त्या बाबाचे प्रशिक्षण आज संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाले
कोल्हापुरात उद्यापासून मराठा समाज सर्वेक्षणाला सुरुवात; सर्वेक्षणात विचारले जाणार 181 प्रश्न
|