बातम्या
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मराठीमोळी खास पदार्थ
By nisha patil - 8/31/2023 5:53:41 PM
Share This News:
मुंबईत आजपासून इंडिया आघाडीची बैठक सुरू होत असून आज संध्याकाळी ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील महत्त्वाचे एकूण 28 पक्षांचे नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. विविध राज्यातील हे नेते असले तरी या नेत्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी मराठमोळे खाद्यपदार्थच ठेवण्यात आले आहेत. वडापाव आणि झुणका भाकरपासून ते पुरणपोळी पर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थांवर पाहुण्यांना ताव मारता येणार आहे.तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचं आयोजन केलं आहे. या नेत्यांसाठी नाश्त्याला बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव ठेवण्यात आला आहे. सोबत चहा आणि कॉफींसह नारळपाणी, लिंबूपाणई तसेच फळांचा रसही ठेवण्यात आला.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मराठीमोळी खास पदार्थ
|