मराठमोळी सोनल काळे ठरली Mrs Asia GB सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट
By nisha patil -
Share This News:
अनेक भारतीय वंशाचे लोक परदेशात जाऊन विविध क्षेत्रात काम करत असतात. अशीच एक भारतीय वंशाची महिला Mrs Asia GB या सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट ठरली आहे. सोनल काळे ही लंडनमध्ये स्थायिक झालेली भारतीय वंशाची महिला आहे. ती Mrs Asia GB या सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या सीझनची फायनलिस्ट ठरली आहे. ही सौंदर्य स्पर्धा aglp एंटरप्राइजेसद्वारे आयोजित केली गेली आहे.
सोनलचा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. सोनल ही तिच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. त्यानंतर तिनं लंडनमधील एका गुजराती व्यक्तीसोबत लग्न केले. सोनल ही एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे. सोनलचे आई-वडील मुंबईत राहत आहेत. सोनल Mrs Asia GB या स्पर्धेची फायनलिस्ट ठरल्यानं तिच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्याबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'मी जन्माने भारतीय, मनाने महाराष्ट्रीयन, वास्तव्याने ब्रिटिश आहे. मी लग्न झाल्यानंतर गुजराती झाले. त्यामुळे मी महाराष्ट्रीयन आणि गुजराती या दोन्हींमध्ये बॅलेन्स ठेवते. Mrs Asia GB या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्वास मिळवणे हा आहे. माझ्या नवीन प्रवासात मला अशा लोकांसाठी रोल मॉडेल व्हायचे आहे ज्यांच्यामध्ये नृत्य करण्याचा, स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास नाही. म्हणून मी येथे मानसिक आरोग्य, प्रेम आणि दयाळूपणा या गोष्टींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आले आहे.'
मराठमोळी सोनल काळे ठरली Mrs Asia GB सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट
|