बातम्या

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

March of Asha workers and group promoters at Zilla Parishad


By nisha patil - 10/26/2023 7:50:58 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक  युनियन मार्फत बुधवारी जिल्हा परिषदेवर विविध मागण्या मान्य करा अशा घोषणा देत मोर्चा काढला होता १८ ऑक्टोबर पासून पूर्ण महाराष्ट्रात अशा व गटप्रवर्तक यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे 

 कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा व गटप्रवर्तक याना ऑनलाईन कामावर होणाऱ्या सक्तीबाबत कृती समितीचे वतीने पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे या आंदोलनात विविध मागण्या घेऊन सहभागी झाले आहेत ,यात गटप्रवर्तकाचे समायोजन करा ,अशा व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाईन कामाची सक्ती पूर्णपणे बंद करा ,दिवाळी बोनस द्या ,आमचे मानधनात  केंद्र सरकारने वाढ करावी ,केंद्र व राज्य शासनाचे मंजूर मानधन एकत्रित तसेच वेळेवर मिळावे ,आरोग्यवर्धिनी मध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करण्यात यावा या  व अशा सर्व  मागण्या तातडीने पूर्ण होऊ द्यात यासाठी बुधवारी जिल्हा परिषेदेच्या प्रांगणात  हे आंदोलन करणेत आले


आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा