बातम्या
शेतकरी संघ सभासदांचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा
By nisha patil - 9/27/2023 6:29:15 PM
Share This News:
शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीमधील तीन मजले देवस्थान समितीने ताब्यात घेतल्याने वाद उफाळून आला आहे त्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नाही तर त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला असून जिल्ह्यात आता कोणती आपत्ती आली म्हणून एवढ्या तातडीने जागा ताब्यात घेतली असा सवाल करत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना ही जागा बळकवायची आहे असा आरोप करण्यात आला आहे
नवरात्र उत्सवात होणारी गर्दी तसेच सध्या असलेला दर्शन मंडप भाविकांना अपुरा पडत असलेने, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यानी शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात केले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात संघाच्या सभासदांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात सर्वपक्षीय नेते देखील सहभागी झाले होते सहकार मोडीत काढणाऱ्या राज्य शासनाचा अधिकार असो, वाचवा वाचवा ,सहकार वाचवा जिल्हाधिकारी चले जाव यासह शेतकरी संघाच्या समर्थनात फलक हाती घेत मोठ्या संख्येने सभासद बांधव मोर्चात सहभागी झाले होते
शेतकरी संघ सभासदांचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा
|