बातम्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहतेची चिमुकल्यासह आत्महत्या

Married woman commits suicide with a child due to torture by inlaws


By neeta - 12/28/2023 1:58:02 PM
Share This News:



गारगोटी : भेंडवडे येथील विवाहतेने पती, सासू ,सासरा, यांच्या छळाला कंटाळून दोन वर्षांच्या चिमुकलासह विहिरीत उडी घेऊन आपल आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. काजल अवधूत सलते व प्रियांश अवधूत चालते अशी वृद्धांची नावे आहेत. याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी पती ननंद सासू-सासरा या चौघांना बुधवारी अटक केली आहे. रात्री दहाच्या सुमारास आत्महत्याची घटना घडली 
    मुगळी येथील काजल हीचा विवाह तेरा वर्षांपूर्वी भेंडवडे येथील अवधूत सलते यांच्याबरोबर झाला होता सध्या त्याचे गावात किराणा मालचे दुकान आहे. काही दिवस तो मुंबईत वास्तव्यास होता. यावेळी  मुंबई खोली घेण्यासाठी अवधूत आणि त्याचे आई बाबा बहीण त्यांनी काजलच्या माहेरी दोन लाख रुपयाची मागणी केली होती. पैशाच्या मागणीची प्रवृत्त होत नसल्यामुळे पती अवधूत व सासू-सासरे आणि नणंद यांच्याकडून काजलला सतत शारीरिक व मानसिक छळ होत होता. या छळाला कंटाळून काजले मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घराजवळील  असलेल्या विहिरीत दोन वर्षांच्या चिमुकलासह उडी घेऊन आत्महत्या केली. काजल ने घरच्या छळाला कंटाळून आपल्या लहानग्या मुलासह  आत्महत्या केल्याची फिर्याद काजलच्या कुटुंबीयांनी बुधवारी पोलिसात दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पती अवधूत बळवंत सलते सासरा सासू यशोदा दत्तात्रय पाटील या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के करीत आहेत यादरम्यान गडहिंग्लज पोलीस विभागीय अधिकारी सतीश नवले यांनी भेट देऊन माहिती घेतली.


सासरच्या छळाला कंटाळून विवाहतेची चिमुकल्यासह आत्महत्या