बातम्या

केजरीवालांच्या समर्थनार्थ आप तर्फे सामूहिक उपोषण

Mass fast by AAP in support of Kejriwal


By nisha patil - 7/4/2024 10:31:46 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली. भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांना अटक झाली होती. ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता. तसेच केजरीवालांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात एक दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला.
केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. आप ने आज देशभरात सामूहिक उपोषणाचे आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्याने आप खा. संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय सुद्बुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.

 

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, आदम शेख, विजय हेगडे, प्रसाद सुतार, समीर लतीफ, संजय नलवडे,  डॉ. कुमाजी पाटील, रमेश कोळी, राकेश गायकवाड, प्रथमेश सूर्यवंशी, अमरसिंह दळवी, आनंदा चौगुले, ईलाही शेख, आनंदराव वणिरे, विवेक भालेराव, मनोहर नाटकर, उमेश वडर, स्वप्नील काळे आदी उपस्थित होते.


केजरीवालांच्या समर्थनार्थ आप तर्फे सामूहिक उपोषण