विशेष बातम्या
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामविस्तारासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा!
By nisha patil - 3/18/2025 5:58:10 PM
Share This News:
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामविस्तारासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा!
आ. राजासिंह ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन – "लोकभावनेचा सन्मान करा!"
नामविस्ताराच्या मागणीसाठी शिवभक्तांचा प्रचंड जनसागर
शिवकालीन वेशभूषेत मावळे, रणरागिणी आणि वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या संपूर्ण नावाला अधिकृत मान्यता देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. हिंदू जनजागृती समिती, हिंदू राष्ट्र समन्वय समिती, आणि विविध संघटनांच्या उपस्थितीत मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
आमदार राजासिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन करत, अन्यथा मुंबईत धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावेळी हजारो शिवभक्त, मावळे, वारकरी, ढोल-ताशा पथक, रणरागिणी पथक यांचा जोशपूर्ण सहभाग दिसून आला.
नामविस्ताराच्या मागणीसाठी नागरिकांचे स्वाक्षरी अभियानही राबविण्यात आले, तसेच महिला व सहभागींसाठी पाणी वाटपाची सोय करण्यात आली. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या मागणीला आता अधिक बळ मिळाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामविस्तारासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा!
|