बातम्या

सांगली लोकसभे मध्ये 'विशाल' बंडखोरी.

Massive rebellion in Sangli Lok Sabha


By nisha patil - 4/17/2024 12:52:21 PM
Share This News:



सांगली लोकसभा मतदारसंघात आज एक नवा ट्विस्ट पहावयास मिळाला. सांगली लोकसभा मतदार संघातील जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये मतभेद होते. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. परंतु सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. सांगली मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या गट आणि संघटनांपेक्षा काँग्रेसची राजकीय ताकद जास्त आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या मते सांगली लोकसभा मतदारसंघावर खरंतर काँग्रेसचाच दावा होता. काँग्रेसकडून एक प्रबळ उमेदवार म्हणून विशाल पाटील यांचे नाव समोर आले होते. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक तरी जागा शिवसेनेला असावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. पण काँग्रेसच्या कार्यकारणी मधून या निर्णयास बरीच नाराजी पाहावयास मिळत होती. काँग्रेसने वाटाघाटी मध्ये सांगली जागेची मागणी केली होती. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला असून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. माझ्या वडिलांप्रमाणे माझी खासदार होण्याची इच्छा आहे यामध्ये काही चुकीचे आहे का असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणामध्ये जनतेला विचारला. असा प्रश्न उपस्थित करताना विशाल पाटील भावनिक झाले होते. अजूनही सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागे  बाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत नसून आता चंद्रहार पाटील माघार घेतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजूनही या जागे संदर्भात कोणताही निश्चित निर्णय स्पष्ट झालेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत महाविकास आघाडी मधील मतभेद काही मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. 


सांगली लोकसभे मध्ये 'विशाल' बंडखोरी.