बातम्या

मविआचा वंचित आघाडीला शेवटचा प्रस्ताव

Maviyas last proposal to Vanchit Aghadi


By nisha patil - 3/26/2024 9:05:13 PM
Share This News:



वंचित बहुजन आघाडी संदर्भात महाविकास आघाडीची वेट अँड वॉच भूमिका असल्याचं दिसून येतंय. वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आणखी एक जागा अधिकची देण्याचा आज प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाची यादी ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर, म्हणजे बुधवारी जाहीर होणार आहे. भिवंडी, सांगली आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटला असल्याची माहिती आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार, जालन्याची जागा काँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. तसेच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटच लढवणार आहे 
 

महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आज नव्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर आपली भूमिका बुधवारी जाहीर करतील अशी चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता ते महाविकास आघाडीच्या साथीने लढणार की तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.


मविआचा वंचित आघाडीला शेवटचा प्रस्ताव