बातम्या

 शिवाजी विद्यापीठात बुधवारी माध्यम संशोधन कार्यशाळा

Media Research Workshop at Shivaji University on Wednesday


By nisha patil - 3/2/2025 10:41:59 PM
Share This News:



 शिवाजी विद्यापीठात बुधवारी माध्यम संशोधन कार्यशाळा

कोल्हापूर ः प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने बुधवार दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी एकदिवशीय माध्यम संशोधन कार्यशाळा आयोजित केली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात इंडियन इन्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अमरावती कॅम्पसच्या मडिया विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे ‘माध्यम संशोधन ः सैद्धांतिक संकल्पना’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसर्‍या सत्रात अहिल्यानगरच्या न्यू आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजच्या कम्युनिकेशन स्टडीज विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. बापू चंदनशिवे ‘माध्यम संशोधन ः उपयोजन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांना खुली असून माध्यमांच्या संशोधनात रुची असणार्‍यांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.


 शिवाजी विद्यापीठात बुधवारी माध्यम संशोधन कार्यशाळा
Total Views: 34