बातम्या

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

Medical tourism should be started  Tourism Minister Shambhuraj Desai


By nisha patil - 1/14/2025 11:08:01 PM
Share This News:



वैद्यकीय पर्यटन सुरू करावे - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पर्यटन मंत्री  देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची १७३वी बैठक झाली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी टुरिस्ट गाईड प्रोग्राम, वैद्यकीय पर्यटन पुन्हा सुरू करणे, जंगल सफारी येथे कॅरॅव्हॅन सुरू करणे, इत्यादींविषयी  सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर येथे ११ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करणे तसेच तापोळा, वासोटा, प्रतापगड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिपॅड उभारण्यास परवानगी मिळवणे, महाबळेश्वर येथे टुरिस्ट गाईड, पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारू नयेत यासाठी गाईड प्रोग्रामची अंमलबजावणी करावी. या प्रोग्राममध्ये अधिक सक्षम प्रमाणीकरण करावे, अशा सूचना पर्यटनमंत्री देसाई यांनी दिल्या.


वैद्यकीय पर्यटन सुरू करावे - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
Total Views: 36